अल्पवयीन मुलीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कोपरगावात वडार समाजाचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:56 IST2018-01-08T13:55:51+5:302018-01-08T13:56:12+5:30
टेंभुर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी वडार समाज संघटनेने कोपरगाव येथे मूक मोर्चा काढला.

अल्पवयीन मुलीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कोपरगावात वडार समाजाचा मूक मोर्चा
कोपरगाव : टेंभुर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी वडार समाज संघटनेने कोपरगाव येथे मूक मोर्चा काढला.
टेंभुर्णी येथील इयत्ता बारावीत शिकणा-या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे काही नराधमांनी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान या घटनेची वाच्यता होऊन नये म्हणून या नराधमांनी संबंधित पीडितेची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ वडार समाज संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार किशोर कदम यांनी निवेदन स्विकारले. याप्रसंगी राजेंद्र गायकवाड, कैलास मंजुळे, संपत रोटे, रवींद्र गायकवाड, देविदास रोटे, शिवाजी कु-हाडे, जितेंद्र रणशुर, चंद्रकांत मंजुळे, दगडू गुंजाळ, लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.