जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST2021-06-05T04:16:12+5:302021-06-05T04:16:12+5:30
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९५.८३ टक्के झाले आहे. दरम्यान, सध्या उपचार सुरू असणारे रुग्ण केवळ ७ हजार ७१२ राहिले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०७ आणि अँटिजन चाचणीत ३४३ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ०२, अकोले १२, नगर ग्रामीण ०१, राहता ०१, राहुरी ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा ३३, अकोले १३, जामखेड ०२, कर्जत २७, कोपरगाव २५, नगर ग्रा. १७, नेवासा १७, पारनेर २८, पाथर्डी ३२, राहाता १२, राहुरी ३३, संगमनेर २३, शेवगाव ४३, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर ३५ आणि इतर जिल्हा ०६, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत ३४३ जण बाधित आढळले. त्यात मनपा ०९, अकोले १४, जामखेड १८, कर्जत २७, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा ३१, पारनेर ४६, पाथर्डी ३८, राहाता २२, राहुरी १९, संगमनेर २५, शेवगाव २०, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर २६ आणि इतर जिल्हा १, अशा रुग्णांचा समावेश आहे.
----------
बरे झालेली रुग्णसंख्या : २,५५,१४५
उपचार सुरू असलेले रुग्ण : ७७१२
मृत्यू : ३३८५
एकूण रुग्णसंख्या : २,६६,२४२