‘महानेट’च्या केबलने उद्ध्वस्त केल्या साईडपट्ट्या
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:42+5:302020-12-05T04:38:42+5:30
सुपा : सध्या ग्रामपंचायतींना महानेटद्वारे जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरू असणाऱ्या कामात ...

‘महानेट’च्या केबलने उद्ध्वस्त केल्या साईडपट्ट्या
सुपा : सध्या ग्रामपंचायतींना महानेटद्वारे जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरू असणाऱ्या कामात ठेकेदारांकडून थेट साईडपट्ट्याच खोदून त्यातील माती लगतच्या रस्त्यावर टाकून दिली जाते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे, असे चित्र पारेनर- डिकसळ- गोरेगाव रस्त्याची झाली आहे.
पारनेर- डिकसळ- गोरेगावला जाणाऱ्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे. काही काम अपूर्ण असतानाच महानेटच्या केबल टाकण्याच्या कामाच्या अतिक्रमणाचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अशीच स्थिती सुपा-शाहजापूर रस्त्यालगत झाली होती. ऐन पावसाळ्यात माती रस्त्यावर पसरवून काम करणाऱ्या महानेटच्या ठेकेदारामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्याबरोबरच अनेक दुचाकी-चालक या मातीवरून वाहन घसरून पडले आहेत. याबाबत ग्रामसडक योजनेचे उपअभियंता डी.डी. चौरे यांच्याशी संपर्क साधला असता रस्ता व साईडपट्ट्या सोडून खोदले तर चालते. खोदकामाला परवानगी देताना भरावाला हात न लावता रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटार भागातून खोदकाम करणे अपेक्षित असते, असे सांगितले.
डिकसळ- गोरेगाव रस्त्यावर झालेले खोदकाम, रस्त्यावर पडलेली माती, त्यामुळे वाहनचालकांची कसरत होत आहे. कॉमटेक या कंपनीने केबलचे काम घेतले असून ते इतर छोट्या-मोठ्या ठेकेदारांना वाटून दिले आहे; परंतु उपठेकेदारांकडून व्यवस्थित काम केले जात नाही.
कोट..
गोरेगाव रस्त्यावर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्याची स्वतः पाहणी करून ते हटविण्याबाबत संबंधितांना सूचना देऊन कार्यवाही करण्यात येईल.
-डी.डी. चौरे,
उपअभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना
कोट..
डिकसळमार्गे रस्त्यावर पडलेली माती काढून पूर्ववत रस्ता करून देण्याबाबत संबंधित ठेकेदारास सूचना देण्यात येईल.
-नदीम सईद,
प्रकल्प अधिकारी, कॉमटेक
फोटो ०४ डिकसळ रोड
पारनेर- डिकसळ- गोरेगाव रस्त्याच्या बाजूने केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावर टाकलेले माती.