श्रीरामपूर नगरपालिकेत अखेर सीएए कायद्याला विरोध करणारा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:33 IST2020-02-29T16:33:14+5:302020-02-29T16:33:20+5:30
श्रीरामपूर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या श्रीरामपूर नगरपाििलकेत शनिवारी अखेर सीएएला विरोध करणारा ठराव एकमताने संमत करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नगरपालिकेत विरोधाचा ठराव मंजूर झाल्याने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनीही दिलेला शब्द पाळला आहे.

श्रीरामपूर नगरपालिकेत अखेर सीएए कायद्याला विरोध करणारा ठराव मंजूर
श्रीरामपूर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या श्रीरामपूर नगरपाििलकेत शनिवारी अखेर सीएएला विरोध करणारा ठराव एकमताने संमत करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नगरपालिकेत विरोधाचा ठराव मंजूर झाल्याने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनीही दिलेला शब्द पाळला आहे.
गत आठवड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य असुनही सीएएला विरोध करणारा ठराव सदस्यांनी फेटाळला होता. त्यामुळे ठरावाला एकप्रकारचे समर्थन केल्याची टीका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर झाली होती. मात्र त्या ठरावाचा व नगरपालिकेचा काही संबंध नाही. तसेच ऐनवेळी ठराव मांडल्याने तो ठराव नगरसेवकांनी फेटाळला होता. त्यानंतरही टीका झाल्याने यावेळी हा विषय नगराध्यक्षा आदिक यांनी सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर घेतला. त्यानंतर याच विषयासाठी शनिवारी विशेष सभा झाली. ठरावावर चर्चा झाल्यानंतर हा ठराव सभेत मंजूर झाला.