युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्ष्यांचे श्रीरामपुरात वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:48 IST2019-01-05T12:48:03+5:302019-01-05T12:48:12+5:30

‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे.

Shriramapura storm of birds 'Rosie Pastor' in Europe | युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्ष्यांचे श्रीरामपुरात वादळ

युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्ष्यांचे श्रीरामपुरात वादळ

शिवाजी पवार
श्रीरामपूर : ‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.
डिसेंबर-जानेवारी हे हिवाळ्यातील दोन महिने त्यांचा येथे सहवास असतो. अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरील इमारतींवर एकत्र जमून सूर्यास्तानंतर ते आकाशात कवायती सादर करतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींची मोठी गर्दी होते. अवघा दहा मिनिटे होणारा आकाशातील त्यांचा अदभूत थरार अचंबित व तितकाच आकर्षित करणारा ठरतो. विशेष म्हणजे वडाच्या एका झाडावर रात्री त्यांचा मुक्काम ठरलेला आहे.
शेतातील पिकांचे अवशेष, किडे हा त्यांचा आहार. शेतकरी व अन्य नागरिकांना कसलेही आर्थिक वा मानसिक नुकसान पोहोचू न देता ते या ठिकाणी आपले नाते व मैत्री जोडतात. हे नाते प्रत्येक वर्षी अधिक घट्ट होते आहे. जारो मैैलाच्या आपल्या प्रवासादरम्यान शांतता, सहजीवन यांचाच जणू ते संदेश देणारे दूत ठरले आहेत.


युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.

भारतात दरवर्षी युरोपियन देशांमधून स्थलांतरित होऊन रोझी पास्टर पक्षी नगरमध्ये येतात़ या पक्ष्यांना आपल्याकडे पळस मैना किंवा भोरड्या किंवा गुलाबी मैना म्हणून ओळखले जाते़ नगर शहरातील तारकपूर बसस्थानक, भिस्तबाग, न्यू आर्टस् कॉलेजचा परिसर तसेच नगर तालुक्यातील कापूरवाडी येथेही हे पक्षी हिवाळ्यात आढळतात़ युरोपात बर्फ पडण्यास सुरुवात झाली की पक्ष्यांना अन्न मिळणे अवघड होते़ त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ ते भारतात येतात़ हे पक्षी साधारणपणे फेबु्रवारीपर्यंत भारतात राहतात़ नंतर हळूहळू पुन्हा त्यांच्या मायदेशात परत जातात.-  प्रा़ सुधाकर कु-हाडे, पक्षी अभ्यासक


व्हिडिओ पाहण्यासाठी  www.Lokmat.com  पेजला भेट द्या.

Web Title: Shriramapura storm of birds 'Rosie Pastor' in Europe