तीन दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:38+5:302021-09-24T04:24:38+5:30

श्रीगोंदा : नगर, पुणे सोलापूर जिल्ह्यांत घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे नावावर असलेले आरोपी अक्षय नवनाथ पवार व ...

Shrigonda police handcuffed three robbers | तीन दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तीन दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

श्रीगोंदा : नगर, पुणे सोलापूर जिल्ह्यांत घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे नावावर असलेले आरोपी अक्षय नवनाथ पवार व संतूर नवनाथ पवार (रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुरेश दसऱ्या भोसले (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) यांना दौंड तालुक्यातील खडकी येथे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हे दरोडेखोर गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होते. या अट्टल आरोपींविरोधात आधीच तब्बल १२ जबरी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचे बागेतून चोरलेले लिंबू व एक दुचाकी हस्तगत केली.

याबाबत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले म्हणाले, २२ सप्टेंबर रोजी सुरेश राजाराम गावडे (रा. काष्टी) यांच्या शेतातील लिंबू चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना श्रीगोंदा तालुक्यात चोरी आणि दरोडा या गुन्ह्यांतील हवे असलेले आरोपी खडकी (ता. दौंड) येथील शिवारात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दौंडचे पोलीस निरीक्षक यांना कल्पना देऊन त्यांच्या मदतीने खडकी येथे सापळा लावून आरोपी जेरबंद केले. आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली.

या कारवाईत ढिकले यांच्यासमवेत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस उपनिरीक्षक अंकुश ढवळे, सहायक फौजदार नंदकुमार भैलुमे, पोलीस हवालदार गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर व फारूख मण्यार यांनी सहभाग घेतला.

Web Title: Shrigonda police handcuffed three robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.