श्रीगोंदा पोलिसांनी केली १९ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:46+5:302021-08-12T04:25:46+5:30
दरोडा, चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गुन्हे, तसेच खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र वापरून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसावा, या ...

श्रीगोंदा पोलिसांनी केली १९ आरोपींना अटक
दरोडा, चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गुन्हे, तसेच खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र वापरून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसावा, या उद्देशाने वेळोवेळी विशेष मोहिमेंतर्गत कारवाया करण्यात येतात. वेळोवेळी गुन्हेगार वस्त्यांवर कोम्बिंग ऑपरेशन राबवून श्रीगोंदा पोलिसांनी रेकॉर्डवरील १९ आरोपींना अटक केली. यात मोक्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे, शिरूर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.
श्रीगोंदा पोलिसांनी दरोडा, घरफोडी व चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघड करीत आरोपींकडून २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
.................
कोयता गँगमधील दोघांना अटक
नुकतीच कोयता गँगमधील दोघांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गावठी हातभट्टीची दारू तयार करणारे व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून २२ आरोपींविरुद्ध कारवाई करून ४६ हजार ४९ रुपये किमतीचा माल जप्त केला आहे, अशी माहिती ढिकले यांनी दिली.