श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:17 IST2020-07-10T17:16:53+5:302020-07-10T17:17:31+5:30

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांनी शुक्रवारी (१० जुलै) सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे दिला आहे.

Shrigonda Market Committee Chairman Dhansingh Bhoyate resigns | श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांचा राजीनामा

श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांचा राजीनामा

श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांनी शुक्रवारी (१० जुलै) सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

सभापतीपदी धनसिंग भोयटे यांना सह्यांचे अधिकार दिले नाहीत. सह्यांचे अधिकार उपसभापती वैभव पाचपुते यांना देण्यात आले होते.

बाजार समितीत १८ सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्य वैभव पाचपुते यांच्य विविरोधात एकवटले आहेत.  वैभव पाचपुते यांना माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला होता.  मात्र नाहाटांना त्यांनी विश्वासात घेतले नाही. अशा परिस्थितीत बाळासाहेब नाहाटा यांनी नाराज संचालकांची पुन्हा जुळवा जुळव केली आहे.  त्यामुळे बाजार समितीत फेरबदल अटळ  आहेत.  

Web Title: Shrigonda Market Committee Chairman Dhansingh Bhoyate resigns