लसींचा तुटवडा; उपकेंद्रांची बुळबुळ कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:29+5:302021-06-02T04:17:29+5:30

केडगावमध्ये सध्या लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिक दिवसभर रांगेत उभे राहूनही त्यांना लस मिळत नाही. काही वयोवृद्ध ...

Shortage of vaccines; Why the bubble of substations? | लसींचा तुटवडा; उपकेंद्रांची बुळबुळ कशासाठी ?

लसींचा तुटवडा; उपकेंद्रांची बुळबुळ कशासाठी ?

केडगावमध्ये सध्या लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिक दिवसभर रांगेत उभे राहूनही त्यांना लस मिळत नाही. काही वयोवृद्ध व महिला रोज चकरा मारतात. मात्र, लस शिल्लक नाही, हाच फलक रोज त्यांना वाचावा लागतो. मनपाकडे लसींचा तुटवडा आहे, तर उपकेंद्र वाढवून लोकांची धावपळ का वाढविली, असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, केडगावची लोकसंख्या १ लाख आहे. आतापर्यंत १० टक्के लोकांनाही लस मिळाली नाही. रोज अपुरा पुरवठा होत असल्याने लोकांनी किती दिवस रांगेत उभे राहून काढायचे. कोठेही लस केंद्र सुरू करा; पण सर्व नागरिकांना मिळेल याची व्यवस्था करा. लस घेण्यावरून नागरिकांचे हाल होत आहेत. किमान याबाबतीत तरी केडगाववर अन्याय करू नका, असे आवाहन पठारे यांनी केले आहे. केडगावचा लस पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे पठारे यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक संग्राम कोतकर उपस्थित होते.

Web Title: Shortage of vaccines; Why the bubble of substations?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.