छावणी परिषद आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:22 IST2021-04-28T04:22:13+5:302021-04-28T04:22:13+5:30
छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होतो. लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागतात. रांगेतही अनेक वादविवाद होतात. भिंगार छावणी ...

छावणी परिषद आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा तुटवडा
छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होतो. लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागतात. रांगेतही अनेक वादविवाद होतात. भिंगार छावणी परिषद आरोग्य केंद्रांतर्गत चार ते पाच गावाचा समावेश आहे. त्यामुळे येथे लसीकरणासाठी मोठी गर्दी होते. यात वृद्धांचे मोठे हाल होतात. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून लसीचा पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. भिंगारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे त्वरित जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, पुरवठाच कमी होत असल्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे.
...............
छावणी परिषदमध्ये लसीचा तुटवडा होत आहे. भिंगारमधील नागरिकांना लस मिळत नाही. काही नागरिक नगरमध्ये जिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी जातात. नागरिकांची लस घेण्यासाठी धावपळ चालू आहे. छावणी परिषद व जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे.
- रोहित पतके, युवा शहर प्रमुख शिवसेना