श्रीरामपुरात प्रेम प्रकरणातून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:56+5:302021-07-28T04:22:56+5:30

शुभम राजू जवळकर (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहरातील शुभम राजकुमार यादव (वय १८, रा. स्मशानभूमीजवळ) ...

Shooting from a love affair in Shrirampur | श्रीरामपुरात प्रेम प्रकरणातून गोळीबार

श्रीरामपुरात प्रेम प्रकरणातून गोळीबार

शुभम राजू जवळकर (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहरातील शुभम राजकुमार यादव (वय १८, रा. स्मशानभूमीजवळ) व मयूर दीपक तावर (वाॅर्ड ३) यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. घटनेला प्रेम प्रकरणाची किनार आहे. शुभम जवळकर व शुभम यादव या दोघांचेही एका मुलीवर प्रेम होते. त्यातून त्यांच्यामध्ये यापूर्वी वाद झालेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जवळकर घटनेतून बचावला. त्याला कोणतीही इजा झाली नाही. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने शुकशुकाट होता. प्रत्यक्ष साक्षीदारही मिळू शकला नसता. गुन्ह्याचा तपास अडचणीचा झाला असता. मात्र पोलिसांनी मेहनत घेऊन गुन्ह्याची उकल केली, अशी माहिती निरीक्षक संजय सानप यांनी दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सानप यांनी ही कारवाई केली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, बिरप्पा करमल, किशोर जाधव, राहुल नरवडे, पंकज गोसावी, रघुनाथ कारखेले सहभागी झाले होते.

---------

Web Title: Shooting from a love affair in Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.