धक्कादायक! आंतरजातीय विवाहामुळे पालकांनीच केली मुलीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:11 IST2019-04-27T12:54:39+5:302019-04-27T13:11:49+5:30

मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे पालकांनीच पोटच्या मुलीची हत्या केलाचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील कौठा गावात घडली.

Shocking Parents have murdered daughter because of inter-caste marriages | धक्कादायक! आंतरजातीय विवाहामुळे पालकांनीच केली मुलीची हत्या

धक्कादायक! आंतरजातीय विवाहामुळे पालकांनीच केली मुलीची हत्या

अहमदनगर : मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे पालकांनीच पोटच्या मुलीची हत्या केलाचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील कौठा गावात घडला. आई -वडिलांनी मुलीला ठार मारुन तिचा मतदेह जाळून टाकला. आई-वडिलांविरुद्ध सोनई पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रतिभा कोठावले असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा पती देवेंद्र कोठावले (रा. संगमनेर) याच्या फिर्यादीवरून ब्रह्मदेव रमाजी मरकड व आई आशा मरकड या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रतिभा आणि देवेंद्र या दोघांनी लग्न केले होते. देवेंद्र कोठावले हा मेडिकल रिप्रेझिटिव्ह म्हणून काम करत आहे. तर मुलगी प्रतिभा मरकड ही मेडिकलमध्ये नोकरी करत होती. याचदरम्यान दोघांची जवळीक वाढली. मुलगा परजातीचा असल्याने मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला. मात्र दोघांनी पळून जाऊन संगमनेरमध्येविवाह केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आई-वडीलांनी प्रतिभाशी संपर्क साधून देवेंद्र यांच्याशी पुन्हा लग्न करून देऊ, असे सांगून गावाकडे बोलवून घेतले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. पती देवेंद्र याने प्रतिभाच्या मोबाईलवर संपर्क साधला पण त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर देवेंद्रने मुलीचे गाव गाठले. त्यावेळी मरकड यांनी मुलीचा हार्ट अ‍ॅटकने निधन झाले असून घरीच अंत्यविधी केला, असे सांगितले. त्यानंतर देवेंद्रने सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Web Title: Shocking Parents have murdered daughter because of inter-caste marriages