Video : कोपरगावातील धक्कादायक प्रकार; महाविद्यालयीन युवतीला बसमधून उतरविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:00 IST2019-07-02T15:54:17+5:302019-07-02T16:00:36+5:30
आगार प्रमुखाने शिक्का न दिल्याने त्याची शिक्षा त्या विद्यार्थिनी भोगावी लागली असती.

Video : कोपरगावातील धक्कादायक प्रकार; महाविद्यालयीन युवतीला बसमधून उतरविण्याचा प्रयत्न
ठळक मुद्दे शिक्का नसल्याने तिला बसमधून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.संबंधित विद्यार्थिनींकडे पैसे भरून काढलेला पास होता.
कोपरगाव - तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथून महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोपरगावसाठी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीला बस कंडक्टरने पासवर शिक्का नसल्याचे कारण देत रस्त्यावर उतरून देण्याचा प्रयत्न केला. संबंधित विद्यार्थिनींकडे पैसे भरून काढलेला पास होता. मात्र, त्यावर शिक्का नसल्याने तिला बसमधून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनी रडू कोसळले. आगार प्रमुखाने शिक्का न दिल्याने त्याची शिक्षा त्या विद्यार्थिनी भोगावी लागली असती.