महावितरणविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:15 IST2017-10-04T14:15:42+5:302017-10-04T14:15:53+5:30
अहमदनगर : वाढते भारनियमन, अवेळी विद्युत प्रवाह खंडीत करणे, विद्युत वाहिन्यांची नादुरुस्ती अशा विविध कारणांमुळे नगर शहरातील तसेच ग्रामीण ...

महावितरणविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आक्रमक
अहमदनगर : वाढते भारनियमन, अवेळी विद्युत प्रवाह खंडीत करणे, विद्युत वाहिन्यांची नादुरुस्ती अशा विविध कारणांमुळे नगर शहरातील तसेच ग्रामीण नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ त्यामुळे महावितरणविरोधात शिवसेना, राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत बुधवारी महावितरण कार्यालयात ठिय्या दिला.
सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन वाढले आहे़ भारनियमनाचे वेळापत्रक कोणते तेच लोकांना समजायला मार्ग नाही़ केव्हाही वीज गायब होते़ त्यामुळे नागरिकांना गरजेच्यावेळीही वीज उपलब्ध होत नाही़ तसेच ज्या वेळी वीज असेल त्यावेळी कोठेतरी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे सांगून वीज पुरवठा खंडीत केला जातो़ त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे़ शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर यांच्यासह शिवसैनिकांनी महावितरण कार्यालय गाठून आंदोलन केले़ त्यावेळी महावितरणमध्येही सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचा मोर्चाही महावितणच्या कार्यालयावर धडकला़ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने महावितरणच्या अधिकाºयांना धारेवर धरीत वीज प्रश्न सोडविण्याची मागणी केली.