शिवबांचा महाराष्ट्र लुंग्या-सुंग्यांना भीक घालणार नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 07:50 IST2019-04-06T07:50:45+5:302019-04-06T07:50:54+5:30

शेवगाव येथील सभेत पवार बोलत होते. मोदींवर टीका करताना त्यांनी गांधी घराण्याचे कौतुक केले

Shivbh's Maharashtra will not begging linguists - Sharad Pawar | शिवबांचा महाराष्ट्र लुंग्या-सुंग्यांना भीक घालणार नाही - शरद पवार

शिवबांचा महाराष्ट्र लुंग्या-सुंग्यांना भीक घालणार नाही - शरद पवार

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडील प्रचाराचे मुद्दे संपले आहेत. गांधी घराण्यावर आरोप करतानाच आता ते आमच्या घरावरही आरोप करू लागले आहेत. मात्र, हा शिवराय, फुले- शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. असल्या लुंग्यासुंग्यांच्या आरोपांना महाराष्ट्र कधीच भीक घालणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.

शेवगाव येथील सभेत पवार बोलत होते. मोदींवर टीका करताना त्यांनी गांधी घराण्याचे कौतुक केले. पवार म्हणाले, गांधी घराण्याने या देशासाठी मोठा त्याग केला आहे. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही तुरुंगवास भोगला आहे. देशाच्या प्रगतीत गांधी घराण्याचा, काँग्रेसच्या सरकारांचा मोठा वाटा आहे. मात्र मोदी हे गांधी घराण्यावर सतत टीका करत आहेत. आता त्यांच्याकडील मुद्दे संपल्याने ते वैयक्तिक मुद्द्यांवर आले आहेत.

Web Title: Shivbh's Maharashtra will not begging linguists - Sharad Pawar