पोखरणा ज्वेलर्सच्या दालनाला शिवानी सुर्वे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:04+5:302021-03-24T04:20:04+5:30
कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत ग्राहकांनी दालनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. १५ वर्षांची विश्वसनीय सुवर्ण सेवेची परंपरा असलेल्या ...

पोखरणा ज्वेलर्सच्या दालनाला शिवानी सुर्वे यांची भेट
कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत ग्राहकांनी दालनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. १५ वर्षांची विश्वसनीय सुवर्ण सेवेची परंपरा असलेल्या दुसऱ्या शाखेतही ग्राहकांना सेवा मिळत आहे. येथील कलाकुसरीचे, सुंदर असे दागिने पसंतीस उतरणारे असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली. शुभारंभानिमित्त विविध मान्यवर तसेच जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील ग्राहकांनीही दालनास आवर्जून भेट दिली.
ए. एच. पोखरणा ज्वेलर्सने कोरोना लक्षात घेऊन ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत १४ ते २१ मार्चपर्यंत साप्ताहिक शुभारंभ सोहळा आयोजित केला होता. नवीन दालनाच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक योजनाही सर्जेपुरा तसेच नवीपेठेतील दालनात सुरू आहेत. यात ३० मार्चपर्यंत दागिने खरेदी करणाऱ्यांना मजुरीत २५ टक्के सवलत देण्यात येत आहे. लग्नसराईची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी मोठी सुवर्णसंधी या योजनेमुळे मिळाली आहे. सर्वात कमी मजुरी दर, हॉलमार्क प्रमाणित दागिने येथील मुख्य वैशिष्ट्य आहे. नव्या प्रशस्त दालनात सर्व प्रकारच्या दागिन्यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. त्यामुळे ग्राहकांना निवांत वातावरणात सोने खरेदी करता येते. प्रशस्त पार्किंगची सुविधाही येथे आहे. ग्राहकांनी दालनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पोखरणा ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे. (वा. प्र.)
फोटो- २३ पोखरणा फोटो
सर्जेपुरा येथील ए. एच. पोखरणा ज्वेलर्सच्या नव्या दालनात अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी भेट दिली. यावेळी पोखरणा परिवाराने त्यांचे स्वागत केले.