खर्डा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:43+5:302021-02-21T04:40:43+5:30
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बसस्थानकाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ...

खर्डा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बसस्थानकाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच रंजना लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी गोलेकर, पूनम खटावकर, कल्याण सुरवसे, श्रीकांत लोखंडे, विजयसिंह गोलेकर, आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयात शिवप्रतिमेचे पूजन सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या हस्ते करून शिवव्याख्याते प्राध्यापक अशोक बांगर यांचे व्याख्यान झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैभव जामकावळे, महालिंग कोरे, श्रीकांत लोखंडे, मदन गोलेकर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, गजानन महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेचे खर्डा इंग्लिश स्कूल यांच्यासह प्राथमिक शाळा, अंगणवाडी, विविध शासकीय कार्यालयांत शिवजयंती साजरी करण्यात आली.
----
२० खर्डा
खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.