नेवाशात शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:37 IST2021-02-21T04:37:51+5:302021-02-21T04:37:51+5:30

नेवासा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नेवासा शहर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. बसस्थानकासमोर घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती ...

Shiva Jayanti celebrated in Newash | नेवाशात शिवजयंती उत्साहात साजरी

नेवाशात शिवजयंती उत्साहात साजरी

नेवासा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नेवासा शहर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली.

बसस्थानकासमोर घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुखदान, भाजपचे जिल्हा संघटन चिटणीस नितीन दिनकर, मनोज पारखे, सुरेश लव्हाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, नानासाहेब पवार, नगरसेवक सचिन नागपुरे, विवेक नन्नवरे, बाळू जाधव, दीपक सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, रमेश शिंदे, सुधीर चव्हाण, शिवभक्त संतोष पंडुरे, राहुल आठरे, साईनाथ वडते, अण्णासाहेब शिंदे, संतोष गरुड, मनोज भोसे, अजित नरुला, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. लोखंडे गल्लीतील मित्रपरिवार तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आकर्षक सजावट केली होती. नगर पंचायत चौकात भाजपच्या शहर शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

---

२० नेवासा शिवजयंती

नेवासा शहरात घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

Web Title: Shiva Jayanti celebrated in Newash