जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:19 IST2020-11-13T13:18:20+5:302020-11-13T13:19:38+5:30

अहमदनगर : पाथडीर् तालुक्यातील मिरी गटातील जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे (वय ४१) यांचे आज (दि.१३) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते होते.

Shiv Sena's Anil Karale passes away | जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांचे निधन

जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांचे निधन

अहमदनगर : पाथडीर् तालुक्यातील मिरी गटातील जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे (वय ४१) यांचे आज (दि.१३) सकाळी दीर्घ आजाराने  निधन झाले. ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते होते.

गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कराळे यांचेे मूळ गाव तालुक्यातील कामत शिंगवे आहे. त्यांच्या मागे दोन मुले, आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. ते मिरी जिल्हा परिषद गटातून विजयी झाले होते. ऐन दिवाळीत कराळे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. 

Web Title: Shiv Sena's Anil Karale passes away