शेवगावात शिवसेनेचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:42+5:302021-02-06T04:38:42+5:30
शेवगाव : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ, महागाई विरोधात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...

शेवगावात शिवसेनेचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
शेवगाव : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ, महागाई विरोधात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख ॲड. अविनाश मगरे आणि शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, युवा सेना तालुका प्रमुख शितल पुरनाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय घाडी, जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे , जिल्हा प्रमुख दक्षिण राजेंद्र दळवी, तालुका संघटक महेश पुरनाळे, चंद्रशेखर ढवळे, महिला आघाडीच्या मंदाकिनी कुलकर्णी, ज्योती केदारी, स्वाती कुलकर्णी, लता ढवळे, कृष्णा कुलकर्णी, रमेश पाटील, उदय गांगुर्डे, अशोक शिंदे, ॲड. अतुल लबडे, गणेश ढाकणे, गणेश पोटभरे, ज्ञानेश्वर धनवडे, अरुण काटे, अशोक गवते, कृणाल साळवे, किरण मगर, अमोल काशीद, अमोल राऊत आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदार अर्चना पागिरे यांना निवेदन दिले.