ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेची शिर्डीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:42+5:302020-12-22T04:20:42+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सर्व ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. तळागाळापर्यंत काम केल्यामुळे शिवसैनिकांना चांगली संधी ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेची शिर्डीत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सर्व ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. तळागाळापर्यंत काम केल्यामुळे शिवसैनिकांना चांगली संधी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसैनिकांना पक्षाकडून ताकद दिली जाईल, असे यावेळी लोखंडे व खेवरे यांनी सांगितले. यावेळी कमलाकर कोते, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख जगताप, विठ्ठल पवार, गंगाधर बेंद्रे, सुभाष उपाध्ये, अनिल बांगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस भागवत मुंगसे, शिवाजी चौधरी, सचिन कोते, गणेश सोमवंशी, भास्कर मोटकर, पुंडलिक बावके, भानुदास कातोरे, सावळेराम डांगे, जालिंदर घोरपडे, संजय आहेर, राजेश कापसे, किरण जपे, हरिराम राहणे, दत्ता आसणे, जयराम कांदळकर, अक्षय तळेकर, विश्वजित बागूल, कस्तुरी मोदलीयर, लक्ष्मी आसने, संगीता जगताप, अनिता सुर्वे आदींची उपस्थिती होती. आभार तालुकाप्रमुख संजय शिंदे यांनी मानले.