केडगावात शिवसेना - राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:45 IST2017-10-04T13:45:39+5:302017-10-04T13:45:53+5:30

केडगाव : केडगाव येथील शांती वनात अत्यंसंस्कारासाठी आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. यात आमदार संग्राम जगताप तसेच ...

Shiv Sena in Kedganga - NCP leaders clash | केडगावात शिवसेना - राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हाणामारी

केडगावात शिवसेना - राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हाणामारी

डगाव : केडगाव येथील शांती वनात अत्यंसंस्कारासाठी आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. यात आमदार संग्राम जगताप तसेच शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नुकतेच शिवसेनेत आलेले हर्षवर्धन कोतकर यांच्यात किरकोळ कारणावरून राडा झाला असून, कोतकर यांना हाणामारी तर सातपुते यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला़ यामुळे केडगावात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.केडगाव येथील रावसाहेब सुंबे यांच्या अत्यंविधीचा कार्यक्रम सकाळी ९ ला केडगाव अमरधाम (शांतीवन) येथे सुरू होता. अंत्यविधी झाल्यानंतर नव्याने शिवसेनेत आलेले काँग्रेसचे माजी पदाधिकारी भानुदास कोतकर यांचे पुतणे हर्षवर्धन कोतकर हे शांतीवनाच्या बाहेर आले. त्यांचा धक्का राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला लागला. यावरून जगताप समर्थक व कोतकर यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला़ त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितली. यामुळे तणाव आणखी वाढला. जगताप समर्थक मोठ्या संख्येने जमा झाल्याने राष्ट्रवादी व शिवसैनिकात राडा सुरू झाला. यात कोतकर यांना हाणामार तर सातपुते यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला़ घटनेची माहिती समजताच पोलीस फौजफाट्यासह केडगावात दाखल झाले. केडगावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे़

Web Title: Shiv Sena in Kedganga - NCP leaders clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.