शिवसेनेत बेरजेचे राजकारण नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:38+5:302021-03-07T04:19:38+5:30

अहमदनगर : शिवसेनेने बेरजेचे राजकारण कधीच केले नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले आहे. महापालिकेतील सभापती ...

Shiv Sena does not have the politics of Berje | शिवसेनेत बेरजेचे राजकारण नसते

शिवसेनेत बेरजेचे राजकारण नसते

अहमदनगर : शिवसेनेने बेरजेचे राजकारण कधीच केले नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले आहे. महापालिकेतील सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे सेनेमध्ये दोन गट असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

लिंक रोड, केडगाव येथील जे.एल.पी. सोसायटीमधील कल्पतरू कॉलनी येथे स्वीकृत नगरसेवक संग्राम शेळके यांच्या निधीतून वाॅर्ड क्रमांक १५ मध्ये अंतर्गत ड्रेनेजलाईन कामाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी नगरसेवक संग्राम शेळके, नगरसेवक विजय पठारे, प्रवक्ते रमेश परतानी, कृष्णा साळवे, संग्राम केदार, पिराजी कोतकर, दिलीप दहिफळे, अप्पासाहेब गागरे, जालिंदर पालवे, सागर गायकवाड, आनंद विधाते, तेजस कपिले, नीलेश लहाने, आदित्य पालवे, चेतन जाधव, डॉ. सोमनाथ पवार व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, बेरजेच्या राजकारणापेक्षा शिवसेनेचा मुख्य उद्देश हा शहराचा विकास करण्याचा आहे. शिवसेनेने इतर पक्षाप्रमाणे कधीही श्रेय लाटण्याचे काम केले नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. उपनगरांचा विकास फक्त शिवसेनेच्याच माध्यमातून होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभापतिपदाच्या निवडणुकीत बेरीज झाली असती तर सेनेचा सभापती होऊ शकला असता. मात्र सेनेत फूट पडल्याचे सभापती निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट झाले.

Web Title: Shiv Sena does not have the politics of Berje