शिवसेना-भाजपने केवळ थापा मारल्या-सक्षणा सलगर; निलेश लंके यांच्या प्रचारार्थ ढवळपुरी येथे सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:55 IST2019-10-18T12:54:31+5:302019-10-18T12:55:16+5:30
शिवसेना-भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात विकासकामे करण्याऐवजी केवळ थापा मारण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली.

शिवसेना-भाजपने केवळ थापा मारल्या-सक्षणा सलगर; निलेश लंके यांच्या प्रचारार्थ ढवळपुरी येथे सभा
पारनेर : शिवसेना-भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात विकासकामे करण्याऐवजी केवळ थापा मारण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ गुरुवारी ढवळपुरी येथे सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निलेश लंके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, अॅड. उदय शेळके, संजीव भोर, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, पंचायत समिती उपसभापती दीपक पवार, पं. स. सदस्या सुनंदा धुरपते, रोहिणी काटे, सुवर्णा धाडगे, तालुकाध्यक्ष पूनम मुंगसे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, जयसिंग मापारी आदी उपस्थित होते.
सलगर म्हणाल्या, सध्याचे सरकार कामगिरी दमदार सांगत प्रचार करत आहेत. मग पंतप्रधान ९ सभा व गृहमंत्री यांच्या १७ सभा का घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे आखाड्यात यायच्या आधीच तुम्ही पराभूत झाले आहेत. सत्ताधारी प्रचारात राज्यातील प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी काश्मीरची चर्चा करत आहेत. लोकांना भिकेला लावण्याचे काम सरकार करत आहे. पूरग्रस्तांच्या वेदना यांना समजत नाहीत. यांचे मंत्री सेल्फी काढण्यात मग्न असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाचे यांना किती मोल आहे, हे दिसून येते.
लंके म्हणाले, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी पारनेर मतदारसंघात विकासकामे केली. त्यानंतर तालुका विकासकामांपासून दूर राहिला आहे.
यावेळी किसनराव रासकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, माजी सभापती सुदाम पवार, शिवाजी औटी, दादा शिंदे, संदीप पवार, सुल्तान शेख, तालुकाध्यक्ष अशोक घुले, तालुकाध्यक्ष योगेश शिंदे, बबलू रोहकले, सुरेश धुरपते, सुभाष लोंढे, राजेंद्र चौधरी, दत्ता आवारी, बाळासाहेब खिलारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.