जामखेडमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:41 IST2021-02-21T04:41:09+5:302021-02-21T04:41:09+5:30

जामखेड : शहरासह तालुक्यातील विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ...

Shiv Jayanti celebration with various activities in Jamkhed | जामखेडमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

जामखेडमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

जामखेड : शहरासह तालुक्यातील विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवाला आमदार रोहित पवार यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, राष्ट्रवादीचे सूर्यकांत मोरे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राजू थोरात, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ.शोभा अरोळे, सुलताना भाभी, मनसेचे दादासाहेब सरनोबत, कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले, वैभव जामकावळे, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, सनी सदाफुले, गणेश पवार, सनी सदाफुले, दादा महाडिक, बापूसाहेब गायकवाड, राजू सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी क्रांती ग्रुपच्या वतीने दांडपट्टा, कराटे, मल्लखांब, तलवारबाजी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते ग्रामीण आरोग्य प्रकल्प व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, नगरपरिषद महिला सफाई कर्मचारी यांना साडी, ट्राॅफी देऊन सन्मान केला. अधिकारी, पत्रकार यांना कोरोना वॉरिअर म्हणून सन्मानित करण्यात आले. दिवसभर पोवाडे गायन करण्यात आले.

आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संतोष नवलाखा, बजरंग सरडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिव्हाळा फाउंडेशन, कोठारी फाउंडेशन, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, विद्यालय यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. योद्धा ग्रुपच्या वतीने ११३ बाटल्या रक्त संकलन केले.

----

२० जामखेड शिवजयंती

जामखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करताना आमदार रोहित पवार, दादा सरनोबत, बापू कार्ले, गणेश पवार, सूर्यकांत मोरे, सनी सदाफुले व इतर.

Web Title: Shiv Jayanti celebration with various activities in Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.