पाच लाख भाविकांचे शनिदर्शन
By Admin | Updated: July 27, 2014 01:09 IST2014-07-26T23:25:34+5:302014-07-27T01:09:04+5:30
सोनई : श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त पाच लाख भाविकांनी शनीदर्शन घेतले. शुक्रवार मध्यरात्रीनंतर १ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्या प्रारंभ झाला.
पाच लाख भाविकांचे शनिदर्शन
सोनई : श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त पाच लाख भाविकांनी शनीदर्शन घेतले. शुक्रवार मध्यरात्रीनंतर १ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्या प्रारंभ झाला. रात्रीपासूनच भाविक मिळेल त्या साधनाने शनीदर्शनासाठी येत होते. शनिवार दिवसभर पूर्ण अमावस्या असल्याने दिवसभर भाविकांची रीघ चालूच होती.
शनिवारी पहाटे खा.चंद्रकांत खैरे, साखरे यांच्या हस्ते शनीआरती झाली. तर सायंकाळी डॉ. राहुल हेगडे यांच्या हस्ते शनी आरती झाली. केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्यासह उद्योगपती अरुण कुसळकर (चाकण), जयेश शहा (झिम्बॉवे) सोनी यांनीही शनीदर्शन घेतले.
शनैश्वर देवस्थानमार्फत आरोग्य, पाणी, सीसीटीव्ही, वॉकी टॉकी, पाणी पुरवठा, मदत कक्ष, देणगी कक्ष उभारण्यात आलेले होते. देवस्थान अध्यक्ष शिवाजीराव दरंदले, कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ व विश्वस्त मंडळ भाविकांचे सोयीसुविधेसाठी प्रयत्नशील होते. एस.टी. महामंडळाचे वतीने यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आलेल्या होत्या. जीप, कार, लक्झरी, दुचाकी इ. मिळेल त्या साधनाने भाविक शिंगणापूरकडे येत होते. देवस्थानपासून दीड किलोमीटर अंतरावर वाहनतळ उभारण्यात आलेले होते. यात्रा स्थळीपूजा साहित्य, पानफुलं, प्रसाद, तेल, खेळणी, चहा, नाष्टा आदी स्टॉल उभारण्यात आलेले होते. देशभरातील विविध अन्नदात्यांनी भोजन, फराळ, नाष्टा, पाणी मोफत वाटप केले. (वार्ताहर)
एजंटांचा सुळसुळाट
पार्कींगजवळ चार चाकी, दुचाकी वाहने बाहेर थांबविण्यात येत होते. परंतु पार्कींगचे आतमध्ये अंदाजे १०० ते १२५ रिक्षा प्रत्येकी दहा रुपयेप्रमाणे पैसे घेऊन भाविकांना थेट जवळ आणून सोडत होते. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते.