शिर्डीचे नवीन पोलीस निरीक्षक कटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 18:53 IST2019-03-01T18:52:47+5:302019-03-01T18:53:34+5:30

शिर्डी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची बेलवंडी(ता.श्रीगोंदा) येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर अनिल कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Shirdi's new police inspector Katke | शिर्डीचे नवीन पोलीस निरीक्षक कटके

शिर्डीचे नवीन पोलीस निरीक्षक कटके

शिर्डी : शिर्डी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची बेलवंडी(ता.श्रीगोंदा) येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर अनिल कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये अहमदनगर पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील एकुण १० पोलीस निरीक्षक व ३ उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जारी केले आहेत. माने हे गेल्या काही वर्षांपासून शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कार्य काळात साई समाधी शताब्दी महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, राष्टÑपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे यशस्वीपणे झाले. तर कटके हे आश्वी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. माने यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिर्डीचे उपनिरीक्षक अशोक खरात यांची राहाता पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय सोनवणे यांची नियुक्ती झाली आहे.

शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औताडे हे काही महिन्यांपुर्वी संगमनेरहून शहर वाहतूक शाखेत बदली होऊन आले होते.
.

 

Web Title: Shirdi's new police inspector Katke