लसीकरणात शिर्डीकरांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:04+5:302021-07-17T04:18:04+5:30

नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अशोक गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, बाळासाहेब ओस्तवाल, भाऊ भोसले, संपत जाधव, राजू ...

Shirdikars should be given priority in vaccination | लसीकरणात शिर्डीकरांना प्राधान्य द्यावे

लसीकरणात शिर्डीकरांना प्राधान्य द्यावे

नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अशोक गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, बाळासाहेब ओस्तवाल, भाऊ भोसले, संपत जाधव, राजू गोंदकर, किरण बर्डे, पंडित गुडे, लखन बेलदार, गणेश सोनवणे, नरेश सुराणा, सचिन तनपुरे यांनी निवेदन दिले.

कोरोना महामारीवर स्व-सुरक्षितता आणि लसीकरण हे दोनच उपाय सध्या उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जनेतेचे विनामूल्य लसीकरण करण्याची केवळ घोषणाच केली नाही, तर त्याची अंमलबजावणीदेखील देशात सुरू आहे. शिर्डी शहरात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून लसीकरण चालू आहे; परंतु त्यामध्ये शिर्डी शहरातील नागरिकांना लस मिळण्यात अडचण येत आहे. शिर्डी शहराची लोकसंख्या जवळपास चाळीस हजार आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ १० ते १२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. काही दिवसांत साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी उघडणार आहे. त्यावेळी संसर्गाची भीती सर्वांत जास्त शहरातील नागरिकांना आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Shirdikars should be given priority in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.