शिर्डीत आठवड्यात दुसरा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 15:57 IST2017-08-31T15:54:44+5:302017-08-31T15:57:57+5:30

शिर्डी : श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाºया शिर्डीत एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या चेहºयावर व डोक्यास जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट होत आहे. या आठवड्यातील अशी दुसरी घटना आहे. पोलिसांनी पहिल्या घटनेतील आरोपीला जेरबंद केले आहे़

Shirdi second blood murdered | शिर्डीत आठवड्यात दुसरा खून

शिर्डीत आठवड्यात दुसरा खून

ठळक मुद्देअज्ञात तरुणाचा उपचार घेताना मृत्यू चेह-यावर व डोक्यास जखमा

शिर्डी : श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाºया शिर्डीत एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या चेह-यावर व डोक्यास जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट होत आहे. या आठवड्यातील अशी दुसरी घटना आहे. पोलिसांनी पहिल्या घटनेतील आरोपीला जेरबंद केले आहे़. २८ आॅगस्टला मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास पोलिसांना संस्थानच्या साईआश्रम भक्तनिवासालगतच्या चोवीस मीटर रस्त्याजवळ एक जखमी तरुण पडलेला असल्याचा दूरध्वनी आला होता़.  त्याच्या चेह-यावर व डोक्यास जखमा होत्या़. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या तरुणाला संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़. मात्र उपचारा दरम्यान २९ आॅगस्टच्या मध्यरात्री या तरूणाचा मृत्यू झाला़. या तरुणाची अजून ओळख पटू शकलेली नाही़. शवविच्छेदनानंतर बुधवारी रात्री याबाबत फौजदार संदीप कहाळे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दहीफळे पुढील तपास करीत आहेत़. गेल्याच आठवड्यात शिर्डीपासून एक किलोमीटर अंतरावर एका तरूणाची हत्या करण्यात आली होती़. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या घटनेतील आरोपीला तात्काळ अटकही केली आहे़.

Web Title: Shirdi second blood murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.