शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर उलटला : चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:00 IST2018-06-23T13:00:02+5:302018-06-23T13:00:15+5:30
राहाता तालुक्यातील केलवड गावात शिर्डी बाह्यवळण रस्त्यावरुन शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला.

शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर उलटला : चालक जागीच ठार
अस्तगाव : राहाता तालुक्यातील केलवड गावात शिर्डी बाह्यवळण रस्त्यावरुन शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये राजस्थानचे सुंदरसिंग दवान सिंग (वय -५१) या चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मालवाहतूक कंटेनर कोल्हापुरवरुन मनमाडच्या दिशेने जात होता. दरम्यान केलवड गावातील चौफुल्यापासुन जात असताना अचानकपणे कंटनेर पलटी झाला. शेजारील प्रभाकर गमे यांच्या ऊसातील शेतात पलटी झाला. अपघातात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिस त्या ठिकाणी हजर झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.