शिर्डीत मेडिकल फोडले, 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:02 IST2018-12-04T17:01:51+5:302018-12-04T17:02:33+5:30

नगर- मनमाड रोडवरील जोशी हॉस्पिटलच्या बाजूला असलेले अश्वमेध मेडीकल दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून २५ ते ३० हजार रुपयेचा ऐवज लंपास केला आहे.

Shirdi medical college, 25 thousand rupees in lieu of lump | शिर्डीत मेडिकल फोडले, 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास

शिर्डीत मेडिकल फोडले, 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास

शिर्डी : नगर- मनमाड रोडवरील जोशी हॉस्पिटलच्या बाजूला असलेले अश्वमेध मेडीकल दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून २५ ते ३० हजार रुपयेचा ऐवज लंपास केला आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिर्डीत सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. उपनगरात बंद घराचे कुलूप तोडणे, घराचा दरवाजा उघडा दिसल्यास पाळत ठेवणे. खिडकीतून बांबूच्या साहाय्याने हंगारच्या पॅन्ट काढून खिशातील पैसे लंपास करणे आदी प्रकारात सातत्याने वाढ झाली आहे. आता तर शहरात मध्यवर्ती ठिकाणी चोरांनी मेडीकल दुकानालाच लक्ष करत धाडसी चोरी केल्याने चिंतेचा विषय झाला आहे. जितेंद्र काशीनाथ दवे (रा.कोकमठाण) यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन भा.द.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांना ताब्यात घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी दुकान चालकाने केली आहे.

Web Title: Shirdi medical college, 25 thousand rupees in lieu of lump