शिर्डीत मनसेचा मोर्चा
By Admin | Updated: February 26, 2016 23:42 IST2016-02-26T23:29:19+5:302016-02-26T23:42:43+5:30
शिर्डी : शिर्डीचे महत्वाचे उपनगर असलेल्या गणेशवाडी रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शिर्डी नगरपंचायतवर मोर्चा काढला.

शिर्डीत मनसेचा मोर्चा
शिर्डी : शिर्डीचे महत्वाचे उपनगर असलेल्या गणेशवाडी रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शिर्डी नगरपंचायतवर मोर्चा काढला. मागण्या मान्य कराव्या, यासाठी आंदोलकांनी नगरपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला.
गणेशवाडीतील मुख्य रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू करण्यात येईल, तसेच साई संस्थानकडून निधी प्राप्त झाल्यानंतर अंतर्गत रस्त्यांचे काम केले जाईल, असे आश्वासन नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निलेश कोते व मुख्य लिपिक मुरलीधर देसले यांनी आंदोलकांना दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष कोते म्हणाले, गणेशवाडीतील रस्त्यांचे काम रखडल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यात मोठ्या आकाराचे खड्डे पडल्याने लहान मुले व वयोवृद्धांना चालताना तोल सांभाळता येत नाही़ अनेकजण पडतात. या रस्त्यांचे तातडीने क्राँक्रिटीकरण तसेच ड्रेनेजचे काम करावे, शिवरस्त्यांचीही कामे करावीत, अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल़ या मोर्चात महेमुद सय्यद, कैलास वाघ, पोपट उमाप, शिवाजी कराड, बाबासाहेब जाधव, बबन गुंजाळ, ज्ञानेश्वर पवळे, संपत हातांगळे, साई धिवर, प्रशांत ठोंबरे, आकाश पवळे, संजय कावरे, गणेश भालेराव, ऋषि सोनवणे, अर्जुन शिंदे, कैलास भुजबळ, शिवा फुंदे, केशव उगले, रावसाहेब देशमुख, ज्ञानेश्वर जगदाळे, संदीप दळवी, अक्षय देवकर, योगेश सोनारे, दीपक शेलार, गणेश कावरे, विलास रणमाळे आदी सहभागी झाले होते.
गणेशवाडीतील मोर्चेकरांची मागणी रास्त असून साई समाधी शताब्दीनिमित्त शिर्डीची विकास कामे हाती घेतली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी केले़
(तालुका प्रतिनिधी)