शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खराब हवामानामुळे पाच दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प, 2000 प्रवाशांना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 08:18 IST

खराब हवामान आणि धुक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिर्डी विमानसेवा ठप्प आहे.

ठळक मुद्देखराब हवामान आणि धुक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिर्डी विमानसेवा ठप्प आहे.28 विमानांमधून दर्शनास येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना त्याचा फटका बसतो आहे.शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज 28 विमानांची ये-जा असते. 

शिर्डी - खराब हवामान आणि धुक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिर्डी विमानसेवा ठप्प आहे. पाच दिवस साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा बंद राहिली आहे. शिर्डीतून विमानसेवा रद्द ठेवण्यात आल्याने भाविकांचे खूप हाल झाले आहेत. शिर्डी विमानळावरून मुंबई, इंदोर, भोपाळ, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर आदी शहरातून दिवसभरात 28 विमानांचे टेकऑफ व लँडीग होत असते. 28 विमानांमधून दर्शनास येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना त्याचा फटका बसतो आहे.

शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज 28 विमानांची ये-जा असते. गुरूवारी खराब व ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचं लँडींग आणि टेकऑफ रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शात्री यांनी दिली होती. मात्र विमानसेवा बंद असल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. विशेष म्हणजे विमान कंपन्या प्रवाशांना आगाऊ सूचना देत नसल्याने भाविकांच्या मनस्तापात भर पडत आहे. 

धुके व ढगाळ वातावरणामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने विमाने माघारी नेण्यात येत आहेत. सलग पाच दिवस विमानसेवा बंद राहिल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व शिर्डी विमानतळ प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात प्रथमच अशा प्रकारची मोठी अडचण आली आहे. यामुळे रन-वे वर लाईट बसविण्याची व नाईट लँडींग सुविधा सुरू करण्याची गरज आहे. सध्या शिर्डी विमानळावरून स्पाईस जेट, इंडियन एअरलाईन्स, इंडिगो आदी विमान कंपन्यांची मुंबई, इंदोर, भोपाळ, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर आदी शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.

नाईट लँडींग सुविधा नाही

रन-वे वरील व्हिजिबीलीटी वाढण्यासाठी काही दिवसांपूर्वी अधिक क्षमतेची अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात किंवा पावसाळ्यातही खराब हवामानाचा इतका फटका बसला नव्हता. पण सध्याच्या कमी ढगाळ वातावरणातही व्हिजिबीलीटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नाईट लँडींग सुविधा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या अडचणी कमी होतील, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Shirdi Airportशिर्डी विमानतळshirdiशिर्डी