शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शिर्डी मतदारसंघाचा राजकीय सारीपाट बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:19 IST

डॉ. सुजय विखे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारीकरिता आघाडीवर असणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : डॉ. सुजय विखे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारीकरिता आघाडीवर असणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विखे यांच्या पक्षांतराच्या घडामोडींमुळे आमदार कांबळे यांनी उमेदवारीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी थांबविली होती. आता पर्यायाने शिर्डीसाठी काँग्रेस पक्षाला पुन्हा राजकीय सारीपाटाचा डाव मांडावा लागणार आहे.मंगळवारी डॉ. सुजय यांनी चर्चेला पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. नगर दक्षिणेतून त्यांची उमेदवारी आता निश्चित झाली आहे. घटनाक्रमाचा केंद्रबिंदू दक्षिणेत असला तरी राजकीय भूकंपाचे हादरे मात्र शिर्डी मतदारसंघात बसले आहेत. काँग्रेस पक्षाने शिर्डी मतदासंघात केलेली जेमतेम तयारीही आता फोल ठरली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी, नेवासे व श्रीरामपूर येथे पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. येथे संभाव्य उमेदवारांच्या नावाची चाचपणी केली. मते जाणून घेण्यात आली. मात्र, ही सर्व प्रक्रियाच थांबली गेली. मतदारसंघातील अन्य तालुक्यात या बैठकाच होऊ शकल्या नाहीत. आमदार भाऊसाहेब कांबळे, युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले, उत्कर्षा रुपवते, राजू वाघमारे या मोजक्याच उमेदवारांचा पर्याय काँग्रेससमोर उभा होता. त्यासाठी मुलाखतीही घेण्यात आल्या. उमेदवारीच्या स्पर्धेत आमदार कांबळे हे सर्वात आघाडीवर मानले जात होते. शिर्डी येथील मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नावाचा आग्रह धरला होता.माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोघांचेही आमदार कांबळे यांच्या उमेदवारीवर एकमत होईल अशी चर्चा होती. आता मात्र आमदार कांबळे यांच्या पुढील राजकीय भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ते कट्टर विखे समर्थक मानले जातात. विखे हेच आपला पक्ष असल्याचे ते अनेकदा जाहीरपणे बोलतात. त्यामुळे ते आपल्या नेत्यांचीच साथ करण्याची शक्यता अधिक आहे. विधानसभा निवडणुकांना सहा महिन्यांपेक्षा अधिक अवकाश आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राधाकृष्ण विखे हेदेखील राजकीय निर्णय घेतील. तोपर्यंत आमदार कांबळे यांची राजकीय कोंडी कायम राहणार आहे. त्यातच शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा या दोन्ही जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत. त्यामुळे गुंता वाढला आहे. आमदार कांबळे समर्थक सभापती दीपक पटारे, माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख, जि.प.सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्यासह कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.शिर्डीची उमेदवारी कोण ठरविणार?शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा विखे-थोरात या नेत्यांचा बालेकिल्ला आहे. मात्र हा मतदारसंघ राखीव असल्याने त्याची बांधणीच केली जात नाही. यावेळीही तेथील उमेदवार ठरलेला नाही. हा उमेदवार ठरविताना राधाकृष्ण विखे यांचे म्हणणे आता विचारात घेतले जाईल का? ही शंका आहे. विखे हे उमेदवारी ठरविणाऱ्या पक्षाच्या केंद्रीय समितीत आहे. त्यांच्या तेथील भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत आता बाळासाहेब थोरात यांना महत्त्व दिले जाऊ शकते.आपण श्रीरामपूरमध्येच थांबून आहोत. कुठलाही राजकीय निर्णय घेतलेला नाही. तशी वेळही नाही. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. -भाऊसाहेब कांबळे,आमदार, श्रीरामपूर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरElectionनिवडणूक 2024