शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

शिर्डीतून ४ नव्या शहरांसाठी विमानसेवा, दररोज 20 विमानांची ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:19 IST

१० जानेवारीपासून चेन्नईला सेवा : रोज २० विमानांची ये-जा

शिर्डी : मुंबई, हैदराबाद व दिल्ली पाठोपाठ साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रविवारी जयपूर, बंगळूरू, भोपाळ व अहमदाबाद या चार नवीन शहरांना विमान सेवा सुरू झाली़ १० जानेवारीपासून चेन्नईसुद्धा विमानसेवेने जोडले जाणार आहे. सव्वा वर्षापूर्वी शिर्डी विमानतळ वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर सुरूवातीला एअर इंडियाने मुंबई व हैदराबादसाठी विमान सेवा सुरू केली होती.

महिनाभरापूर्वी दिल्लीसाठी सेवा सुरू झाली. रविवारी आणखी चार अशी आतापर्यंत आठ शहरे शिर्डीशी जोडली गेली आहेत़ सध्या शिर्डीला रोज २० विमाने येत-जात आहेत़ पंधरवाड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता जयपूरवरून स्पाईस जेटचे विमान शिर्डीत उतरले़ त्यातून ५८ प्रवासी आले़ विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री व टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा यांनी केक कापून नव्या सेवेबद्दल आनंद व्यक्त केला. स्पाईस जेटच्या सहा फ्लाईटमधून रविवारी ५०८ प्रवासी आले तर ५२२ प्रवासी परत गेले़ याशिवाय एअर अलाईन्सच्या मुंबई, हैदराबादसह रोज जवळपास दीड हजारावर प्रवासी ये-जा करणार आहेत़जयपूर, भोपाळ व चेन्नईसाठी दररोज उड्डाणे जयपूर, भोपाळ व चेन्नईसाठी दररोज उड्डाणे होतील. बंगळुरूला मंगळवारी व अहमदाबादला रविवारखेरीज रोज सेवा सुरू राहील, असे दीपक शास्त्री यांनी सांगितले़ 

टॅग्स :shirdiशिर्डीShirdi Airportशिर्डी विमानतळairplaneविमान