शिर्डीत चोरी : २ लाखांची रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:16 IST2018-09-01T18:14:18+5:302018-09-01T18:16:07+5:30

चोरट्याने शिर्डीमधील एका दुकानाच्या गल्ल्यातील २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका जणाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Shibir Chori: Rs 2 lakh lump sum | शिर्डीत चोरी : २ लाखांची रक्कम लंपास

शिर्डीत चोरी : २ लाखांची रक्कम लंपास

शिर्डी : चोरट्याने शिर्डीमधील एका दुकानाच्या गल्ल्यातील २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका जणाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील कोते गल्लीमध्ये अनिलकुमार इश्वरप्पा भंडारी यांच्या मालकीचे हॉटेल आहे. याच ठिकाणी भंडारी यांचे जावई सत्यनारायण अतु लोरी यांचे दुकान आहे. शनिवारी रात्री साडे बारा ते पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान दगु उर्फ राजू अशोक पवार, रा. रूई (ता.राहाता) याने या दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. याप्रकरणी भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पवार याच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.बी.मंडलिक करीत आहेत.

Web Title: Shibir Chori: Rs 2 lakh lump sum