गुन्हेगारांना पिस्तोल पुरविणारी शेवगावची टोळी बारामतीत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:22 IST2021-02-11T04:22:58+5:302021-02-11T04:22:58+5:30
शेवगावच्या या टोळीला मध्यप्रदेशमधून पिस्तुल पुरवणाऱ्या म्होरक्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. सात दिवसांपूर्वी काही संशयित आरोपी बारामतीत पिस्तोल विक्री ...

गुन्हेगारांना पिस्तोल पुरविणारी शेवगावची टोळी बारामतीत जेरबंद
शेवगावच्या या टोळीला मध्यप्रदेशमधून पिस्तुल पुरवणाऱ्या म्होरक्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. सात दिवसांपूर्वी काही संशयित आरोपी बारामतीत पिस्तोल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाला माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पाच संशयितांना बारामतीतून ताब्यात घेवून त्यांच्याकडून ५ पिस्तुल व १० राउंडस मिळून आले आहेत. हनुमंत अशोक गोलार (वय २२ रा.जवळवाडी,खरवंडी कासार ता.पाथर्डी), अल्ताफ सज्जद पठाण (वय ३० रा. नाईकवाडी मोहल्ला,शेवगाव), संतोष प्रभाकर कौटुंबे, (वय ३८ रा. मारवाड गल्ली शेवगाव), जफर अन्सार इनामदार (वय २८ रा.नाईकवाडी मोहल्ला. शेवगाव), जावेद मुनीर सय्यद (वय २२ रा. आखेगाव रोड, भापकर वस्ती, शेवगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान या कारवाईच्या आठ दिवस आधी पोलिसांनी पाथर्डी येथील अमोल रमेश गर्जे ( रा. शिरसठवाडी ता.पाथर्डी) याच्यासह तिघांना अटक करून त्यांच्याकडून ७ पिस्तुलसह १० जिवंत काडतूस जप्त केले होते.
----------
शेवगावमधील हत्यार तस्करी उघडकिस
बारामती पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शेवगाव येथील आरोपींकडून होणारी हत्यारांची तस्करी प्रथमच समोर आली आहे. अटक केलेले सर्व आराेपी २० ते २५ वयोगटातील आहेत. शेवगाव पाथर्डी येथील आरोपींसह त्यांचे इतर जिल्ह्यातील साथीदार यांचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.