शेकटे, आधोडीतील कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:19 IST2020-06-08T13:18:52+5:302020-06-08T13:19:04+5:30

शेवगाव तालुक्यातील  आधोडी व शेकटे बुद्रुक येथील जावई असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल शनिवारी (दि. ६ जून) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील १० वर्षीय चिमुरड्यासह ३ जणांना तपासणीसाठी पाठविले होते. सोमवारी (दि. ८) त्या ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिरानी यांनी दिली आहे. 

Shekte, reports of persons in contact with the corona in the lower back are negative | शेकटे, आधोडीतील कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह 

शेकटे, आधोडीतील कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह 

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील  आधोडी व शेकटे बुद्रुक येथील जावई असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल शनिवारी (दि. ६ जून) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील १० वर्षीय चिमुरड्यासह ३ जणांना तपासणीसाठी पाठविले होते. सोमवारी (दि. ८) त्या ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिरानी यांनी दिली आहे. 

कळव्याहून आपल्या कुटूंबासह गावी येत असताना प्रवासादरम्यान त्रास जाणवू लागल्याने नगर येथेच जिल्हा रूग्णालयात दाखल झालेला शेवगाव तालुक्यातील आधोडी येथील भाचे जावई अन् शेकटे बुद्रुक येथील जावई शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून  आले होते.

 हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घुले, डॉ. परमेश्वर गलांडे, डॉ.अरविंद घुले यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी आधोडी व शेकटे येथे दाखल झाले. याठिकाणी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन माहिती संकलित करण्यात आली. या सर्वांना तपासणीसाठी पाठविले होते. 

Web Title: Shekte, reports of persons in contact with the corona in the lower back are negative