बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी, कालवड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:57+5:302021-02-05T06:35:57+5:30

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव व अकलापूर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत मेंढी व कालवड ठार केल्याची घटना गुरूवारी पहाटेच्या ...

Sheep and calves killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी, कालवड ठार

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी, कालवड ठार

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव व अकलापूर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत मेंढी व कालवड ठार केल्याची घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. दिवसेंदिवस पठार भागात बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या एलखोपवाडी येथे संतोष दशरथ निमसे हे शेतकरी राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी जनावरे गोठ्यात बांधली होती. गुरुवारी पहाटे बिबट्याने गोठ्यात घुसून एका कालवडीवर हल्ला करत ठार केले.

दुसरी घटना घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरे मळा येथे घडली. महादू रामदास खेमनर या मेंढपाळांच्या वाघुरीत घुसून बिबट्याने एक मेंढी ठार केली.

बिबट्याने बुधवारी पहाटे भोर यांच्या कालवडीवर हल्ला करत ठार केले होते. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Sheep and calves killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.