शरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली अन् नागवडे माईंना अश्रू अनावर झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 15:55 IST2018-09-23T15:55:03+5:302018-09-23T15:55:58+5:30
शिवाजीराव नागवडे यांनी काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना आयुष्यभर जोपासण्याचे काम केले आहे. त्यांना राज्य सहकारी साखर कारखानदारीचे

शरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली अन् नागवडे माईंना अश्रू अनावर झाले
श्रीगोंदा - शिवाजीराव नागवडे यांनी काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना आयुष्यभर जोपासण्याचे काम केले आहे. त्यांना राज्य सहकारी साखर कारखानदारीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांचे सर्वाशी सुसंवाद व विचारविनिमय केलेले काम आयुष्यभर स्मरणात राहील, असे उद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. शरद पवार हे नागवडे कुंटबीयांचे सांत्वन करण्यासाठी वांगदरी येथे आले, त्यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, बापूंच्या अंगात जबरदस्त इच्छाशक्ती होती. त्यामुळे रुग्णालयात जाईपर्यत त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला. आजारपणातून बाहेर पडतील अशी आशा होती पण सर्व काही तुमच्या आमच्या हातात नसते. राजकारणात नेहमीच प्रामाणिकपणे साथ देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे मागील निवडणुकीत राहुल जगताप यांना संधी मिळाली. त्यांची पुढची पिढी व राजेंद्र नागवडे अनुराधा नागवडे हे चांगले काम करीत असून त्यांचा आधार तुटला आहे. आपणास बापूंनी दाखविलेल्या आदर्श मार्गाने जावे लागणार आहे. नागवडे कुंटबीयांचा आधार म्हणून कार्यकर्त्यांनी साथ देण्याची जबाबदारी पार पाडावी हीच बापूंना श्रध्दांजली ठरेल.
यावेळी आ.मोनिका राजळे, आ.राहुल जगताप, माजी आमदार अशोक पवार, दादाभाऊ कळमकर राजेंद्र फाळके, आण्णासाहेब शेलार अरुण कडू, दादाभाऊ कळमकर, तुकाराम दरेकर, भाऊसाहेब कचरे, हरिदास शिर्के प्रशांत दरेकर केशव मगर आबासाहेब जगताप उपस्थित होते.
नागवडे माईंना अश्रू अनावर
शरद पवार यांनी राजेंद्र नागवडे समवेत बापूंच्या धर्मपत्नी कौशल्यादेवी (माई) नागवडे यांची भेट घेतली, त्यावेळी माईंना अश्रू अनावर झाले.