Vidhan Sabha2019: आचारसंहिता लागताच शरद पवारांनी सोडले विश्रामगृह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:18 IST2019-09-21T12:55:25+5:302019-09-21T13:18:52+5:30
राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाले. सकाळी पवार हे नगर-औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहात थांबले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी १२ वाजता निवडणुकीची आचारसंहिता लागताच पवार यांनी तातडीने विश्रामगृह सोडले.

Vidhan Sabha2019: आचारसंहिता लागताच शरद पवारांनी सोडले विश्रामगृह
अहमदनगर : राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाले. सकाळी पवार हे नगर-औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहात थांबले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी १२ वाजता निवडणुकीची आचारसंहिता लागताच पवार यांनी तातडीने विश्रामगृह सोडले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी आहे. दरम्यान, राष्टवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये पवार हे नगरमध्ये सकाळीच दाखल झाले होते. पवार हे तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. दुपारी निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागल्याने त्यांनी तातडीने शासकीय विश्रामगृह सोडले. यानंतर ते टिळकरोडवरील मंगल कार्यालयात होणा-या सभेसाठी रवाना झाले.