शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: अण्णा हजारेही शरद पवारांबद्दल भरभरून बोलले, भाजपाचे कान खेचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 16:56 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचे कौतुक केले आहे. पक्ष बदलणा-यांना हजारे यांनी उड्या मारणा-या माकडांची उपमा दिली आहे. 

विशेष मुलाखत / सुधीर लंके अहमदनगर: शरद पवार यांचे व माझे वैचारिक मतभेद आहेत.  मात्र, असे असले तरी या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जे काम केले ते आपणालाही भावले आहे. ध्येयाने प्रेरित होऊन झपाटल्यासारखा त्यांनी भर पावसात प्रचार करत पक्षाला जीवदान दिले व विरोध जीवंत ठेवला, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचे कौतुक केले आहे. पक्ष बदलणा-यांना हजारे यांनी उड्या मारणा-या माकडांची उपमा दिली आहे. विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हजारे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात जो निकाल हाती आला तो सदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक लोकांनी पक्षांतर करुन माकडउड्या मारल्या. इकडून तिकडे गेले. वैयक्तिक अडचणीत आले किंवा एखादा पक्ष अडचणीत आहे म्हणून त्याला सोडून सोयीच्या पक्षात जायचे हे योग्य नाही. हे सर्व स्वार्थी राजकारण आहे. मात्र, मतदारांनी अशा माकडउड्या मारणाºयांपैकी १७ उमेदवारांना घरी बसविले आहे. माझ्यादृष्टीने या निवडणुकीतील ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. लोकशाहीच्या वाढीसाठी मतदारांनी असे करणे गरजेचे होते. शरद पवारांच्या प्रचारनितीची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. हजारे व पवार यांच्यात अनेकदा मतभेद झालेले आहेत. दोघांनीही एकमेकांवर जाहीर टीकाटिपण्णी केलेली आहे. मात्र, ‘लोकमत’च्या या मुलाखतीत त्यांनी पवारांच्या प्रचारतंत्राचे कौतुक केले. ते म्हणाले, पवार  व माझ्यात मतभेद आहेत. अर्थात हे मतभेद समाजाच्या हितासाठीच आहेत. मी त्यांच्या मंत्र्यांबाबतही अनेकदा तक्रार केली. मात्र, पवारांनी यावेळी ज्या पद्धतीने प्रचार केला तो तरुणांनाही लाजविणारा आहे. आपला पक्ष रसातळाला चालला आहे हे पाहून या वयात ते राज्यभर फिरले. पक्षाला त्यांनी अडचणीतून बाहेर काढले. त्यांच्या प्रचाराचा त्यांचा मित्र असलेल्या कॉंग्रेसलाही फायदा झाला. अन्यथा हे पक्ष आता संपतील की काय असा धोका निर्माण झाला होता. या पक्षांना भविष्य दिसत नव्हते. विरोधामुळे लोकशाही जीवंत राहते. त्यामुळे सत्ताधा-यांना विरोध हा असायलाच हवा. पवारांनी विरोध कायम ठेऊन जनतेला जागे करण्याचे काम केले आहे. ध्येयाने पछाडलेले असे राज्यकर्तेच लोकशाही मजबूत करु शकतात, अशा भावना त्यांनी बोलून दाखविल्या. चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे अशी पुस्तीही त्यांनी आपल्या या वक्तव्याला जोडली. निवडणुकीचा एकूण जो प्रचार झाला तो बरोबर नव्हता. त्यात वैयक्तिक हेव्यादाव्यांचीच चर्चा अधिक होती. प्रचारात हे घडणे अपेक्षित नाही. विकासावरती चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले. सत्ताधा-यांना अहं नडलाभाजप-सेनेच्या जागा का घटल्या असाव्यात या प्रश्नावर भाष्य करताना हजारे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत असले तरी त्यांचे मंत्री, कार्यकर्ते यांचा जनतेशी संपर्क तुटला होता. त्यांच्यात अहं निर्माण झाला होता. आम्हाला कोणी हरवू शकत नाही. आमच्यासारखे आम्हीच, अशी त्यांची भावना झाली होती. विरोधी पक्ष रसातळाला गेला आहे, असा भास निर्माण करण्यात आला होता. या सर्व गोष्टींमुळे भाजप-सेनेच्या जागा घटल्या. आता निकालातून त्यांना धडा मिळेल. यापुढे ते जपून वागतील. मतदार हा राजा आहे. तो जागा झाला तर काय करतो हे सत्ताधा-यांनाही समजेल. शरद पवारांनी परिवर्तन आणल्यामुळे राज्यकर्ते आता जागे होतील.  जाहिरनामे न पाळल्यास पदे बरखास्त करानेत्यांची पक्षांतरे थांबविण्यासाठी बॅलेटवर ‘नोटा’ ऐवजी ‘वरील एकही उमेदवार पसंत नाही’ असे लिहायला हवे. त्यासाठी स्वतंत्र चिन्ह हवे. उमेदवारांपेक्षा या चिन्हाला जास्त मते पडली तर फेरनिवडणूक घ्यायला हवी. ज्या उमेदवारांना नाकारले. त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधीच द्यायला नको. यातून गुंड, व्याभिचारी लोकांंना पक्ष तिकिटच देणार नाहीत. तसेच उमेदवार व पक्ष जे जाहिरनामे काढतात ते न पाळल्यास त्यांना बरखास्त करण्याची तरतूद हवी. म्हणजे उगाचच कोणतीही आश्वासने देऊन दिशाभूल केली जाणार नाही, असेही हजारे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019anna hazareअण्णा हजारेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा