शरदचंद्रजी पवार मेडिकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:51+5:302021-03-24T04:18:51+5:30
श्रीरामपूर : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत वडाळामहादेव येथील शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने ८० टक्के ...

शरदचंद्रजी पवार मेडिकल
श्रीरामपूर : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत वडाळामहादेव येथील शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने ८० टक्के निकाल नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये शुभम मोहिते, ओमकार खिलारे, भारत टोम्पे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
द्वितीय वर्षाचा निकाल ९५ टक्के नोंदविला गेला. त्यात गणेश जगदाळे, रुषदा आसिफ, स्वाती बिच्कुले यांनी यश मिळविले.
विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ. शकील सौदागर, डॉ. बापूसाहेब हरिषचंद्रे, डॉ. जय खरात, अरुण फरगडे, विपीन जेठलीया, लहू पाटील, अभय पानसंबळ, भगिरथ जाधव, विद्या दहे, दर्शनी साबळे, अनिता आगळे आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार, प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव, प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे.
--------