आदिनाथ महाराज शास्त्री यांना शनिरत्न पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 15:01 IST2019-08-10T15:01:08+5:302019-08-10T15:01:33+5:30

श्री शनैश्वर देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव लक्ष्मण बानकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिला जाणारा ‘शनिरत्न पुरस्कार’ या वर्षी तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना प्रदान करण्यात आला.

Shani Ratna Award given to Adinath Maharaj Shastri | आदिनाथ महाराज शास्त्री यांना शनिरत्न पुरस्कार प्रदान

आदिनाथ महाराज शास्त्री यांना शनिरत्न पुरस्कार प्रदान

सोनई : श्री शनैश्वर देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव लक्ष्मण बानकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिला जाणारा ‘शनिरत्न पुरस्कार’ या वर्षी तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. बद्रीनाथ महाराज तनपुरे, माजी खासदार दादापाटील शेळके, विश्वासराव गडाख, सुनिलगिरी महाराज, सुनिता गडाख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सेवेची किमया मोठी असून वारकरी सांप्रदाय सेवाच्या माध्यमातुन समाजाला उर्जा देण्याचे काम करतो. महाराष्ट्रात सध्या पुराच्या पाण्याने तांडव घातले असून तेथील लोकांना मदतीची गरज आहे. यामुळे प्रत्येकाने आपआपल्या परीने सेवा करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले. देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, सरपंच बाळासाहेब बानकर, बापुसाहेब शेटे, पोलीस पाटील सयराम बानकर, डॉ.बापुसाहेब देसाई यांच्यासह भाविक उपस्थित होते.

 

Web Title: Shani Ratna Award given to Adinath Maharaj Shastri