मरगळलेल्या भाजपाला शहा पॅटर्नची संजीवनी

By Admin | Updated: July 30, 2014 00:45 IST2014-07-29T23:29:55+5:302014-07-30T00:45:40+5:30

अहमदनगर : देशामध्ये भाजपाची सत्ता आली तरी नगर जिल्ह्यातील भाजपा अजूनही मरगळलेल्या अवस्थेत आहे.

Shahjahan's shocking BJP | मरगळलेल्या भाजपाला शहा पॅटर्नची संजीवनी

मरगळलेल्या भाजपाला शहा पॅटर्नची संजीवनी

अहमदनगर : देशामध्ये भाजपाची सत्ता आली तरी नगर जिल्ह्यातील भाजपा अजूनही मरगळलेल्या अवस्थेत आहे. मात्र या मरगळलेल्या पक्षाला अमित शहा पॅटर्न संजीवनी देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन, उत्तम व्यवस्थापन करण्याचे आदेश प्रदेश समितीकडून पक्षाला मिळाले आहेत. त्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते कामाला लागले असून एक आॅगस्टपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
गेल्या आठवड्यात प्रदेश समितीच्या दोन-तीन बैठका झाल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील पक्ष मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि कमकुमत जागा यासाठी प्रचार नियोजन, संपर्क व्यवस्थापन, कार्यकर्ता निर्माण आदींवर भर देण्यात येणार आहे.
विधानसभा प्रमुख आणि निवडणूक व्यवस्थापन समिती गठीत केली जाणार आहे. या दोन्हीसाठीची नावे जिल्हा समिती अंतिम करणार आहे. ही नावे प्रदेशाध्यक्षांकडून घोषित केली जाणार आहेत. संघटन मंत्री राजेंद्र फडके यांच्या नेतृत्त्वाखाली नियोजन होणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अन्य जिल्ह्यात विस्तारक म्हणून प्रचार करता येणार आहे. निवडणुकीच्या कालावधीसाठी पूर्णवेळ निवडणूक सहायक नियुक्त करणार आहे. (प्रतिनिधी)
आगरकरांकडेच जिल्ह्याची जबाबदारी
लोकसभा निवडणुकीप्रमाणे जिल्ह्यातील भाजपाचे पक्षाचे नेतृत्त्व नगरचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्याकडेच राहण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी करण्याचे आदेश प्रदेशने आगरकर यांनाच दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण जिल्ह्याचे संघटनात्मक व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी आगरकर यांच्यावरच सोपविण्यात आली आहे. त्यामुळे नवा जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
दोन निरीक्षकांची नियुक्ती
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन पक्ष निरीक्षकांची प्रदेश समितीने नियुक्ती केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार माधुरी मिसाळ (पुणे) यांची जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा ५आॅगस्टपासून जिल्हा दौरा सुरू होणार आहे. भाजपाच्या मतदारसंघात जाऊन ते प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच प्रदेश पदाधिकारी म्हणून योगेश गोगावले यांची प्रदेश समितीने नगर जिल्ह्यासाठी नियुक्ती केली आहे. शंभर टक्के बुथरचना करण्यासाठी ते नियोजन करणार आहेत.
दोन मतदारसंघ कठीण
नगर जिल्ह्यातील भाजपाच्या वाट्याला आलेले पाथर्डी-शेवगाव आणि नेवासा या दोन विधानसभा मतदारसंघाची कठीण मतदार संघाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. तेथील जागा भाजपाला मिळवून देण्यासाठी प्रदेशकडून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आमदार पंकजा पालवे-मुंडे यांच्याकडे पाथर्डी-शेवगाव, तर विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यावर नेवासा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना ‘विधानसभा पालक’असे संबोधण्यात आले आहे.

Web Title: Shahjahan's shocking BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.