जालन्याचा शाहरुख खान नगरमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:21+5:302021-05-03T04:15:21+5:30

शाहरुख व त्याच्या साथीदारांनी २९ एप्रिल रोजी नगर-मनमाड रोडवर थांबलेल्या ट्रक चालकांवर कोयत्याने हल्ला करून त्यांच्याकडील २१ हजार रुपयांचा ...

Shah Rukh Khan of Jalna arrested in Nagar | जालन्याचा शाहरुख खान नगरमध्ये जेरबंद

जालन्याचा शाहरुख खान नगरमध्ये जेरबंद

शाहरुख व त्याच्या साथीदारांनी २९ एप्रिल रोजी नगर-मनमाड रोडवर थांबलेल्या ट्रक चालकांवर कोयत्याने हल्ला करून त्यांच्याकडील २१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात किशोर मोतीराम दुकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, शाहरुख खान याच्या टोळीने ही लूटमार केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. माहितीनुसार उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार यांच्या पथकाने नवनागापूर येथून शाहरुख याला अटक केली. शाहरुख याच्या विरोधात जालना परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणी पोलिसांपुढे हजर करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Shah Rukh Khan of Jalna arrested in Nagar