दरोड्याच्या तयारीतील सातजण अटकेत
By Admin | Updated: February 18, 2016 23:25 IST2016-02-18T23:21:42+5:302016-02-18T23:25:26+5:30
कोपरगाव : दरोड्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सात जणांना कोपरगाव शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली़

दरोड्याच्या तयारीतील सातजण अटकेत
कोपरगाव : दरोड्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सात जणांना कोपरगाव शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली़ त्यांच्या जवळून तीन बंदुका, गुप्ती, गज अशी हत्यारे जप्त करण्यात आली़ ही घटना गुरूवारी पहाडे साडेतीनच्या सुमारास नागपूर-मुंबई मार्गावर कोकमठाण शिवारात घडली़
बुधवारी रात्री नागपूर-मुंबई हायवेवर कोकमठाण शिवारात दरोडा पडणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना मिळाली होती़ त्यावरुन त्यांनी या परिसरात गस्त वाढवली़ गुरूवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास तीन दुचाकींवर सात जण कातकडे पेट्रोल पंपाजवळ आले़ पोलिसांना पाहताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते़ मात्र पोलिसांनी सातही जणांना शिताफीने पकडले़ आरोपींकडून एक मोठी एअर रायफल, एअर पिस्टल, एक बनावट बंदूक, गुप्ती, गज, पाईप अशी हत्यारे तसेच मोबाईल हस्तगत करण्यात आले़
अमोल जीवन मिसाळ, संतोष रामभाऊ मिसाळ (दोघे रा़ संगमनेर),मोहसिन हरूण अत्तार, गोरख विश्वनाथ जाधव (दोघे रा़ सिन्नर), राजू अशोक गव्हाणे (रा़ कळवण, जि़ नाशिक), साईनाथ अशोक कुसाळकर, राहुल अशोक बारहाते (रा़ सडे, ता़ कोपरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ पोलीस कॉन्स्टेबल संदिप देवराम बोटे यांच्या फिर्यादीवरून वरील सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
(प्रतिनिधी)