आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 15:15 IST2021-01-20T15:15:06+5:302021-01-20T15:15:31+5:30
राहुरी : तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एकत्र येत मिरवणूक काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वांबोरीतील सात जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
राहुरी : तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एकत्र येत मिरवणूक काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वांबोरीतील सात जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी बराटे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, तुषार संभाजी मोरे, नवनाथ गवते, किसन जवरे, गोरख देवकर, स्वर कुसमुडे, गोरख ढवळे व प्रशांत नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बराटे करत आहेत.