वांगदरीत साकारणार ४५ घरकुलांची वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:42+5:302021-03-24T04:18:42+5:30

या वसाहतीचे भूमिपूजन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच ...

A settlement of 45 households will be set up in Wangdari | वांगदरीत साकारणार ४५ घरकुलांची वसाहत

वांगदरीत साकारणार ४५ घरकुलांची वसाहत

या वसाहतीचे भूमिपूजन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच आदेश नागवडे, पंचायत समितीचे शाखा अभियंता डी. डी. कांगुणे, उपसरपंच शिवाजी ज्ञानदेव चोरमले, राजेंद्र नागवडे, महेश नागवडे, संजय नागवडे, विकास अडगळे, गणेश दिवेकर, लक्ष्मीबाई बापूराव काटे, पुष्पा मोहिते, दिलीप मासाळ, अशोक पारखे, तुषार नागवडे उपस्थित होते.

वांगदरी येथील गट नं. २५५ मधील ३८.५ आर जागेवर महाराष्ट्र शासनाने घरकुले बांधकाम करणेसाठी ४५ लाभार्थींच्या नावे जागा वर्ग केली. या जागेवर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांनी घरकुलांना मंजुरी दिली आहे. लाभार्थीना मंगळवारी प्लॉट वाटप करून घरकुलाचा पहिला हप्ता नावे वर्ग करण्यात आला. शासकीय जमीन लाभार्थीचे नावे करून घरकुल मंजुरीचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे.

महिला बालकल्याण समिती माजी सभापती अनुराधा नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रकल्प संचालक पठारे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी परीक्षण घेतले. या प्रकल्पाची संकल्पना गावचे तत्कालीन ग्रामसेवक अनिल जगताप यांनी मांडली. प्रस्ताव तयार केला व ग्रामविकास अधिकारी नवनाथ गोरे यांनी प्रकल्प मंजूर करून घेतला. प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यात काँक्रीट रस्ता, पाणीपुरवठा व्यवस्था, स्ट्रीट लाइट, खेळाचे मैदान अशा सर्व सुविधा पुरविणार आहे, असे मत शिवाजीराव नारायणराव नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचालक ग्रामविकास अधिकारी नवनाथ गोरे यांनी केले, तर आभार सरपंच आदेशराव नागवडे यांनी मानले.

...............

२०१८मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार वांगदरी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून आमचे घरकुलांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. याचा मनात आनंद आहे.

- किरण वायकर, लाभार्थी

.............२३ नागवडे.........

Web Title: A settlement of 45 households will be set up in Wangdari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.