कोपरगाव मतदार संघात MIDC उभारा; आशुतोष काळेंची उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी
By सचिन धर्मापुरीकर | Updated: July 27, 2023 19:49 IST2023-07-27T19:48:18+5:302023-07-27T19:49:08+5:30
आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

कोपरगाव मतदार संघात MIDC उभारा; आशुतोष काळेंची उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी
सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर): कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध होवून मतदार संघाच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात औद्योगिक केंद्र (एम.आय.डी.सी.) उभारावे, अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदार संघात एम.आय.डी.सी. उभारावी याबाबत त्यांना लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघ अवर्षणग्रस्त असून जिरायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मतदार संघातील तरुणाच्या हाताला रोजगार नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते. त्यामुळे मतदार संघात एम.आय.डी.सी. झाल्यास बेरोजगार तरुणाईच्या हाताला रोजगार उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागात एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.